Home गडचिरोली अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर बाबी राहाणार 16 जुलै पर्यंत...

अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर बाबी राहाणार 16 जुलै पर्यंत बंद।

125

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0075.jpg

अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर बाबी राहाणार 16 जुलै पर्यंत बंद।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : जिल्हात 10 जुलै पासुन मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधुन पाणी वाहत आहे.यामुळे अहेरी,सिंरोचा व भामरागड तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे.तसेच गडचिरोली,आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे.जिल्हा प्रशासनाने दिं 11 ते 13 जुलै दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापणा बंद राहाणार याबाबत आदेश लागू केले होते.आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शनिवार दिं 16 जुलै 2022 च्या मध्यराञी पर्यत वाढ केली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरीकांनी घाबरुन न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.गडचिरोली जिल्हात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी तीन दिवस घरातच कुंटुबाबरोबरच वेळ घालवावा कारण फिरण्यासाठी अथवा अती महत्त्वाचे काम नसतांना बाहेर पडल्यास आपल्यासह कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो.जिल्हा प्रशासन पोलिस यंञणासह सर्व घटनांनवर लक्ष ठेवुन आहे.त्यामुळे नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.यामुळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे की , शनिवार दिं 16 जुलै 2022 शासकीय निमशासकीय व अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, कॉलेजेस बाकी आस्थापणा बंद राहणार आहे.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे