Home गडचिरोली भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे थोर विचारक

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे थोर विचारक

111

आशाताई बच्छाव

IMG-20220706-WA0011.jpg

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी हे थोर विचारक

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त पुष्पअर्पण करून केले अभिवादन

एक देश मे दो प्रधान ,दो निशाण नहीं चलेंगे असे म्हणत कश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग व्हावा यासाठी दिले बलिदान भारतीय जनसंघाचे संस्थापक, काश्मीर करिता आपल्या प्राणाचे बलिदान देणारे, थोर शिक्षण तज्ञ, कायदे पंडित, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे महान विचारक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना केले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे ओबीसी जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे , ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीकजी राठी सोनापूरचे उपसरपंच शेषराव कोहळे , पुरुषोत्तमजी बोरकुटे, यांचे सह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी डॉ मुखर्जी यांनी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यातच त्यांचे बलीदान झाले .

आज काश्मीर मध्ये 370 कलम रद्द झाले. परंतू त्याची पार्श्वभूमी ही डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानातून तयार झालेली आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या बलिदानाचा त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने काश्मीर मधील ३७० कलम रद्द केले . त्यांचे विचार आजच्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायक असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आदर्शमय कार्यकर्ता होण्यासाठी श्यामाप्रसादजींचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी याप्रसंगी केले.

Previous articleशेती आणि शेतकरी हाच विकासाचा केद्रबिंदू: आ.सुधीर मुनगंटीवार मूल येथील कृषीमहाविद्यालयाच्या कामाला आता येणार वेग!
Next articleशिवकल्याण संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताह मोठया उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.