Home बुलढाणा पळशी सुपो येथे कृषी सप्ताह अंतर्गत कृषी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न

पळशी सुपो येथे कृषी सप्ताह अंतर्गत कृषी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न

114

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0029.jpg

पळशी सुपो येथे कृषी सप्ताह अंतर्गत कृषी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

जळगाव जा:- पळशी सुपो येथे कृषी सप्ताह अंतर्गत दिनांक 2 जुलै रोजी कृषी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न.
स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती प्रित्यर्थ ग्रा. कृ. का. कार्यक्रम आणि रा. से. यो.स्वा.वीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खत व्यवस्थापन आणि शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष मान्यवर गावचे सरपंच श्री.सुरेश ठाकरे,प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेले ता. कृषी अधिकारी श्री.धीरज वाकोडे सर ,कृषी सहाय्यक कु.पूजा गवळी मॅडम ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी श्री.अविनाश आटोळे सर ,कार्यक्रम समन्वयक म्हणून विद्या कपले,श्री. प्रितेश वानखडे सर उपस्थीत होते.
या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी लक्षणीय उपस्थिती दिली. व या कार्यक्रमात स्वा.वीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे सातव्या सत्रातील कृषीदुत गौरव शिंगोटे, दिपक सपकाळ, यश राठोड, शेख सोहेल, शुभम शेंडे, विष्णू साई , सागर सोळंके, ओम घोडसाळ, ऋषिकेश ठाकरे, योगेश वाकुडकर , संदेश वाघ, प्रसाद काळोघे हे विद्यार्थी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Previous articleकृषी विद्यार्थ्यांनी नांदगाव पेठ गावामध्ये “कृषिदिन” केला साजरा
Next articleमोफत बियाणे : ऑनलाईन नोंदणी; तरीही मिळाले नाही बियाणे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.