Home नाशिक शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे जागतिक डॉक्टर दिन व महाराष्ट्र कृषी...

शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे जागतिक डॉक्टर दिन व महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला

120

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0038.jpg

शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे जागतिक डॉक्टर दिन व महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला                        सटाणा,(जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज दिनांक 1 जुलै 2022 शुक्रवार रोजी शारदा पब्लिक स्कूल अजमिर सौंदाणे येथे जागतिक डॉक्टर दिन व महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला,त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवळाणे गावचे सरपंच केदा शिरसाठ,कऱ्हे गावच्या सरपंच सौ अर्चनाताई पवार,सुदर्शन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर राकेश महाजन,आरोग्य सेवक डॉक्टर खैरनार सर,श्री गुलाबसींग मगर, व श्री अमोल जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सुदर्शन हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर राकेश महाजन यांनी भूषविले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.डॉ राकेश महाजन यांचा व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रुणाली जाधव मॅडम यांनी केले,त्यानंतर संस्थेचे संस्थापक चेअरमन.महेश मगर सर व आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे भाषणे झाली.यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा सादर केल्या,त्यावेळी भाषण व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सोनवणे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज पाटील सर यांनी केले,यावेळी सर्व प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमन महेश मगर सर,शाळेच्या मुख्याध्यापिका रुणाली जाधव मॅडम,शिक्षिका प्रणिता सोनवणे,नलिनी बच्छाव,संगीता पाटील,पूजा सोनवणे, राणी सूर्यवंशी,पूजा पवार,आशा सोनवणे, अश्विनी रौदळ,मनोज पाटील सर,राधिका पवार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleआमदार मा. राज्यमंत्री संजयभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next articleडॉक्टर दिननिमित्त सत्कार करण्यात आला मा .जी नगरसेवक संजय नाना काटे युवा मंच वतीने
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.