Home बुलढाणा काटेल धाम येथे न्यू स्माईल फाऊंडेशन मुंबई कडून स्ट्रीट लाईट व सोलर...

काटेल धाम येथे न्यू स्माईल फाऊंडेशन मुंबई कडून स्ट्रीट लाईट व सोलर पॅनल भेट

133

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0012.jpg

काटेल धाम येथे न्यू स्माईल फाऊंडेशन मुंबई कडून स्ट्रीट लाईट व सोलर पॅनल भेट                            बुलढाणा,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुंबई येथील न्यू स्माईल फाऊंडेशन हे नेहमी समाज कार्यात अग्रेसर असतात त्यांनी आताच संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम ला स्ट्रीट लाईट व सोलर पॅनल भेट दिले
तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम यांनी न्यू स्माईल फाउंडेशन ला मंगणी केली की आमचे संस्थान हे अत्यंत दुर्गम भागात असुन व खेडे विभागात स्थापित आहे येथे निराधार मुलांसाठी वारकरी शिक्षण संस्था,गरुजूगरीब विद्यार्थी याना मोफत शिक्षण,कपडे वाटप तसेच गोरगरीब साठी धर्माथ दवाखाना चालविण्यात येत आहे हे संस्थान दुर्गम विभागात येत असल्यामुळे अत्याधुनिक सुखसोयी नाहीच्या बरोबर आहे तसेच विजेचा सतत चा लपंडाव लोडेशेंडीग यांचा संस्थान ला त्रास होत आहे रात्री विद्युत पुरवठा नसल्यास अंधार पडतो म्हणून आम्हाला सोलर पॅनल व स्ट्रीट लाईट चा पुरवठा कऱण्यात याना अशी मंगणी संस्थान कडुन करताच मुंबई येथील न्यू स्माइल फाउंडेशन कडून 10 स्ट्रीट लाईट व पाच kv चे सौर ऊर्जेवर चालणारे सोलर पॅनल लावण्यात आले याचे उदघाटन दि 24 जून रोजी संस्कार परिवार चे धीरज चांडक,पंकज राठी,अकोला तसेच न्यू स्माइल फाउंडेशन मुंबई चे दीनानाथ तिवारी,तन्मय मुखर्जी, प्रल्हाद घाणेकर यांच्या उपस्थितीत पार पडला या वेळी श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम चे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते

Previous articleराजीनामा दिलाच..! ठाकरे सरकार बरखास्त..!
Next articleब्रेकींग न्युज…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.