Home नांदेड नायगावात राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी

नायगावात राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी

115

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0010.jpg

नायगावात राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी

नायगांव तालुका प्रतिनिधी – निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्यूज )

नायगाव बाजार ,दि.२६ जुन२०२२ ) शहरातील डॉ हेडगेवार चौक येथे छ. राजश्री शाहू महाराज यांची जयंती गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली.छञपती .राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला नायगाव जनता विकास आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, मा नगरसेवक देविदास पाटील बोमनाळे, गजानन पाटील चव्हाण,सह सामाजिक कार्यकर्ते राजकूमार कांबळे, गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाचे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मोठ्या भक्तिभावाने अभिवादन करण्यात आले. राजश्री शाहू महाराज त्यांच्या कार्याला त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी वंदन करून वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना गजानन चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी हार्दिक शुभेच्छा! दिल्या. यावेळी माधव रेजितवाड, शंकर धर्मकार, पञकार शिवाजी कुंटूरकर,जय भीम मित्र मंडळाचे अध्यक्ष गौतम वाघमारे, राजपूत सर, डॉ.चिकणेकर साहेब,राजपाल सोनटक्के, अनिल हनमंते, बाबासाहेब वाघमारे, अविनाश साबने, हानमंत वाघमारे, राहूल वाघमारे, सह गजानन पाटील चव्हाण मित्र मंडळाचे कार्यकर्ते, जनता विकास आघाडीचे आदी मान्यवर इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले ,

Previous articleआसेगाव येथील पाणी पुरवठा बंद
Next articleअकोला जिल्ह्यात पुराचे पाणी गावात घुसल्याने हाहाकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.