Home नांदेड कृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ

कृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ

115

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0044.jpg

कृषी संजीवनी मोहिमेचा लोंढेसांगवी येथे शुभारंभ
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत कृषि संजीवनी सप्ताह-2022 चा शुभारंभ जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या हस्ते सोयाबीनची बीबीएफ पद्धतीने पेरणी करून लोहा तालुक्यातील लोढेसांगवी या गावात करण्यात आला. मूल्य साखळी दिनानिमित्त मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) समुदाय आधारीत संस्थाची मूल्यसाखळी विकास शाळा खरीप हंगाम सन 2022 अंतर्गत गोविंद प्रभू शेतकरी उत्पादक कंपनी लि. लोंढे सांगवी येथे आयोजित करण्यात आली. यावेळी बीज प्रक्रिया व जागर तंत्रज्ञानाचा अंतर्गत बीबीएफवर पेरणी करण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक नांदेड चलवदे, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती माधुरी सोनवणे , लोहा तालुका कृषि अधिकारी अरून घुमनवाड, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल या सर्वांनी कृषि संजिवनी सप्ताह विषयी मार्गदर्शन केले. रोहित कंपनीचे व्यवस्थापक टोंपे यांनी बीबीएफ यंत्राची सविस्तर माहिती दिली. सौ. लक्ष्मीबाई मारोती लोंढे यांच्या शेतावर बि.बि.एफ.द्वारे पेरणी करण्यात आली. गोविंद प्रभु या शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मारोती किशन लोंढे, संदीप रामजी लोंढे, दिगांबर गुणाजी लोंढे, विठ्ठल कदम, सौ.रेखा व्यकंटी लोंढे व अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Previous articleनांदगांव तालुक्यातील जातेगाव येथिल,खारी नदीत बैलगाड़ी उलडुन तीन महिलांचा,मुत्यु।       
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.