Home बुलढाणा वरवट बकाल येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वरवट बकाल येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

137

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0044.jpg

वरवट बकाल येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपुर:- राज्यपुरुस्कृत सोयाबीन प्रकल्पाअंतर्गत प्रक्षेत्रावर बि बी एफ पेरणी मार्गदर्शनआज मौजे वरवट बकाल येथील शेतकर्‍यांना सोयाबीन पेरणी विषयी के व्ही के जळगाव जामोद चे शास्त्रज्ञ श्री तलोकर साहेबांनी सोयाबीन लागवडीच्या अष्टासूत्रापैकी शेतकर्‍यांना बी बी एफ यंत्र सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी शेतकर्‍यांना बी बी एफ पेरणी यंत्रा बद्दल असलेल्या शंकांचे निसरण करण्यात आले तसेस तालुका कृषि अधिकारी ए.जी. बनसोडे यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बिजप्रक्रिया या विषयी माहिती देऊन ते कार्यपध्द्त करूनच पेरणी करण्याचे आव्हान शेतकर्‍यांना केले या वेळी उपस्थित शेतकर्‍यांनी बी बी एफ पेरणी करण्याविषयी मान्ये केले व बी बी एफ पेरणी साठी आपले नाव नोंदणी केले या वेळी उपस्थित शेतकर्‍यांनी या बाबीसाठी चांगला प्रतिसाद दिला तसेस यावेळी शेतकर्‍यांनी विजेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दामिनी अँप चा वापर करावा या विषयी रवी जाधव कृषि सहायक यांनी माहिती दिली. या वेळी मंडळ कृषि अधिकारी एस.आर.अवचार कृषि मित्र किशोर रौंदळे, सतीश टाकळकर, प्रल्हाद अस्वार, नंदकिशोर रेखाते, उदध्व ढगे, गोपाल टाकळकर, प्रदीप डाबरे, संतोष घायल व नागेश्वर महाराज सेंद्रिय शेतकरी गटातील आदि शेतकरी उपस्थित होते.

Previous articleहरणबारी घाटात संरक्षक भिंत नसल्याने प्रवास धोक्याचा.
Next articleद्रौपदी मुर्मू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.