Home बुलढाणा काळाने केला घात, विज पडुन दोघांचा मृत्यु तर 2 जखमी

काळाने केला घात, विज पडुन दोघांचा मृत्यु तर 2 जखमी

138

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0020.jpg

काळाने केला घात, विज पडुन दोघांचा मृत्यु तर 2 जखमी                                                            संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहरप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
दिनांक २३ जून रोजी दुपारच्या वेळी विजांच्या
गडगडाटासह संग्रामपूर तालुक्यासह पळशी झाशी शिवारात जोरदार पावसाला सुरवात झाली. पळशी झाशी शिवारातील शुभम हेलगे यांच्या शेतात क्रेनद्वारा विहिरीचे खोदकाम सुरु होते शेतात ऐकून 4 जण काम करत होते तेवढ्यातच अचानकपणे कडकडाट वीजांचा आवाज सह पाऊस पडायला सुरुवात झाली अचानक पणे शेतातील विहिरीवर क्रेनद्वारा खोदकाम करत असलेले संजय उत्तम मारोडे वय ५५ वर्ष तर रवी संजय भालतडक वय ३५ वर्ष यांचे का अंगावर विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला असून तीथेच काम करणारे मंगेश मनोहर बाखरे व बंडू मधूकर मारोडे यांनी आपले कपडे पावसाने भिजतील या कारणाने ते थोडे अंतरावर एका आडोशाला गेले त्यामुळे ते सुद्धा जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून ते यामधून बचावले.प्राथमिक उपचारासाठी सर्वप्रथम जखमी झालेल्या दोघांनाही गावातील लोकांनी संग्रामपूर येथे आणि उपचारासाठी दाखल केले असुन मृतक रवि भलतिडक आणि संजय मारोडे यांना पंचनामा आणि शव प्रक्रियेकरिता वरवट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले
प्राथमिक तपास कैलास मेश्रे म.न.पा 1709 केला असून
पुढील तपास रामकीसन माळी साहेब म.न.पा.1558
हे करीत आहे
पुढील उपचारासाठी जखमींना रूग्णवाहिकेव्दारे शेगावला रवाना करण्यात आले. मृतक संजय उत्तम मारोडे हे अल्पभूधारक असून त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, २ मुली असुन रवि संजय भालतडक यांच्यामागे १ मुलगा, १ मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे.तरुण तडफदार गावातील या तरुणांच्या जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Previous articleजागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleशिवसेनेत बंडखोरीचे मुळ शिवसेना भवनच…? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचे बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.