Home बुलढाणा जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

129

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0028.jpg

जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

जळगाव जामोद:- सातपुडा शिक्षण संस्था जळगांव जामोद द्वारा संचालित व डॉ० पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित
स्वा. वि. ग. इं. कृषि व उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद तसेच कृषि विज्ञान केंद्र, जळगांव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…
८ वे जागतिक योग दिन दि. २१ जून २०२२ रोजी साजरा करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित योग दिना निमित्य स्थानिक आर्ट ऑफ लिविंग चे योगशिक्षक श्री. प्रसेनजीत मिश्रा यांनी उपस्थित विद्यार्थी, स्वयमसेवक् तसेच प्राध्यापक वृंद यांना प्राणायाम व योग क्रिया तथा सूर्य नमस्कार विधी कशा प्रकारे कराव्यात आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवांना मध्ये कशा प्रकारे समावेश करता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये योग आणि आरोग्य संपत्ती याबद्दल सकारात्मक भावना निर्माण करून व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असते आणि याच माध्यमातून योग दिन साजरा करतांना विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा सहभाग या माध्यमातून दिसून येतो. कृषि विज्ञान केंद्र चे वरिष्ठ संशोधक डॉ० विश्वास जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. योगेश गवई तसेच प्रा. अविनाश आटोळे, प्रा. तुळशीराम राठोड, प्रा. चंद्रशेखर भोपळे, प्रा. शाम बैरागी, प्रा. सतीश धर्माळ, इ. प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप
Next articleकाळाने केला घात, विज पडुन दोघांचा मृत्यु तर 2 जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.