Home नांदेड योग साधना माणसाला आनंदी राहण्याचे बळ देणारे शास्त्र आहे – प्राचार्य डॉ....

योग साधना माणसाला आनंदी राहण्याचे बळ देणारे शास्त्र आहे – प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे

146

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0023.jpg

योग साधना माणसाला आनंदी राहण्याचे बळ देणारे शास्त्र आहे –
प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाकडून ” आंतरराष्ट्रीय योग ” दिवस साजरा करण्यात आला . योग हे माणसातील आळस व वेदना शमवण्यासाठी उपयोगी आहे . योग साधना माणसाला आनंदी राहण्याचे बळ देणारे शास्त्र आहे असे मत प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे , प्रमुख पाहुणे विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट योग साधक रोहित गवळे , व्यासपीठावर उपप्राचार्य एस.बी.बळवंते , प्रा.सी.बी.साखरे , अधिक्षक एस.के.सुर्यवंशी हे होते . या कार्यक्रमाचे संयोजक क्रीडा संचालक डॉ. जयदीप कहाळेकर , क्रीडा निर्देशक डॉ. संजय गायकवाड हे होते . महाराष्ट्र शासन व , विद्यापीठ आणि सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . शाल , पुष्पहार देऊन प्रशिक्षकाचा सत्कार करण्यात आला .
योगासनाचे विविध प्रकार , आहार , विहार , जिवन जगण्याची पध्दती याविषयी माहिती देत रोहित गवळे यांनी प्रात्यक्षिके सादर केले . प्राचार्यांनी सर्वाना योगाचे महत्त्व आणि सर्वांगीण विकासासाठी पुरक कौशल्य आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन केले . याप्रसंगी बहुसंख्येने प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .