Home नांदेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा पळसगाव येथे ग्राम सर्वेक्षण उपक्रम.

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा पळसगाव येथे ग्राम सर्वेक्षण उपक्रम.

162

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0024.jpg

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थांचा पळसगाव येथे ग्राम सर्वेक्षण उपक्रम.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी-औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव येथील विद्यार्थ्यांनी पळसगाव येथे लोकसहभागातून ग्रामसर्वेक्षण (PRA) उपक्रम राबविला. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामसर्वेक्षण करताना व सामाजिक नकाशा काढताना गावातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रगतशील शेतकर्‍यांचा सहभाग व मार्गदर्शन घेऊन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे स्वतःचे गाव कसे दिसते हे प्रत्यक्षात नकाशात उतरविले.
या नकाशात गावातील रस्ते सामाजिक संरचना घरे व वास्तव्याचा प्रकार शाळा ग्रामपंचायत इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला.
उपक्रम राबवताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावाचा संपूर्ण अभ्यास करून गावातील लोकांच्या समस्या व त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेऊन गावातील उपस्थित असलेल्या साधन संपत्तीचा अभ्यास केला. उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तुषार जोंधळे, वैभव पौळ, तुषार मुंनेशवर, नीरज रत्नपारखी, प्रतिक नादरे, प्रसाद पवार, प्रीतम येडले, ऋषिकेश जाधव, पवण सांगळे, गजानन सवांडकर व श्याम शेळके या सर्व कृषी दूतांनी परिश्रम घेतले.
यावेळी गावचे सरपंच प्रतिनिधि श्री साहेबराव कांबळे, उपसरपंच प्रभाकर शिंदे, माजी सरपंच शिवाजी शिंदे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चोइन सर, प्रगतशील शेतकरी हणमंत इंगळे व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा कार्यक्रम एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव श्री रवींद्र पाटील चव्हाण, संचालक श्री रमेश लवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश नादरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकुश खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला आहे.

Previous articleकदम अकॅडमी च्या लोहकरे राहुलने गणित विषयात मिळवले 100 पैकी 100 गुण.
Next articleराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आरोग्य योजना जनतेपर्यंत पोहोचवा व्यात. हरिहरराव भोसिकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.