आशाताई बच्छाव
पाऊस नावाला, दामिनीचे मात्र थैमान ! वीज पडून एकाचा मृत्यू ; एक गंभीर …!
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा:-
जिल्ह्यात अजूनही दमदार व पेरणीयोग्य पाऊस झाला नसला तरी विजेचे थैमान कायम आहे. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांत विजेने एकाचा बळी घेतला तर एक इसम गंभीर जखमी झाला.
बुलडाणा नजीकच्या कोलवड येथे काल, रविवारी( दि १९) दुपारी अडीच वाजताच्या आसपास अंगावर वीज कोसळून एक जण गंभीर जखमी झाला. राजेश शेषराव जाधव असे त्याचे नाव असून ते शेतात काम करीत असताना विजेचा लोळ अंगावर कोसळला. जखमी जाधवला बुलडाण्याच्या एका खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. अन्य घटनेत जळगाव तालुक्यातील आडोळ बुद्रुक येथील पंजाब उत्तम उगले( ५५)यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.






