Home नाशिक व-हाणे प्रकरणात गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे प्रत्यक्ष कृती कधी करणार?जनतेत उत्सुकता..

व-हाणे प्रकरणात गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे प्रत्यक्ष कृती कधी करणार?जनतेत उत्सुकता..

146

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1655634500188.jpg

व-हाणे प्रकरणात गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे प्रत्यक्ष कृती कधी करणार?जनतेत उत्सुकता..
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-सरकारी कामकाजाच्या त-हा या अजबच असतात,लालफितीचा कारभार अन दप्तर दिरंगाईचा फटका अनेकांना भोगावा लागतो.तर काही ठिकाणी ग्रामसेवक मनमानी करुन “हम करे सो”या न्यायाने गोरगरीबांना छळण्याचेच कामे करतात.मात्र जेथे मलिदा मिळतो,तेथे बेकायदेशीर कामही कायदेशीर केल्याचा दिखावा निर्माण करतात.मात्र या अशा गैरकृत्य करणाऱ्या ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचे महापापही वरिष्ठ अधिकारी करीत असतात,तेव्हा नक्कीच वाटायला लागते की,दातही आपले अन ओठही आपले या न्यायाने संबधित कर्मचाऱ्यांला पाठीशी घालून वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करताना वरिष्ठ अधिकारी दिसून येतात.हे मात्र आश्चर्यकारकच म्हटले पाहिजे. याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट आमच्या वाचकांसाठी!नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या व-हाणे या गावातील ग्रामपंचायतीच्या अनागोंदी व भोंगळ कारभाराचा हा अजब गजब प्रकार….शासनाने महिलांना विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आरक्षण दिल्यामुळे आज बहुतांश महिला या तलाठी ग्रामसेवक व विविध पदावर कार्यरत आहेत.मात्र कर्तव्य करतांना आपल्या नोकरीशी व सेवेशी प्रामाणिक राहुन कर्तव्य पार पाडायची ही नियमावली असताना येथे मात्र स्वतःच्या मनमानी व हट्टीपणामुळे सुरु असलेल्या कामकाजाचा फटका दस्तुरखुद्द व-हाणे गावच्या माजी सरपंच श्रीमती संगिता रमेश पवार यांना देखील बसला आहे,त्याबाबतचा हा वृतांत..व-हाणे या गांवी श्रीमती सुवर्णा कडू सांळुखे या ग्रामसेविका पदावर कार्यरत आहेत.आजवर त्यांची कारकिर्द हाताणे,लेंडाणे सारख्या गावातही वादग्रस्त ठरलेली आहे.तसाच प्रकार व-हाणे या गावातही श्रीमती सुवर्णा सांळुखे यांनी केला.अचंबित करणारी व आश्चर्याची गोष्ट अशी की,व-हाणे गावच्या माजी सरपंच श्रीमती संगिता पवार यांच्या पतीचे निधन झालेले असताना त्यांचे घर नियमानुसार पत्नी हयात असल्याने संगिता पवार यांचे नावे करणे नियमाने बंधनकारक असताना ग्रामसेविका सांळुखे यांनी मात्र स्वतःच्या हेकेखोर व मनमानी स्वभावाने नियम वगैरे सगळे गुंडाळून रमेश पवार यांचे घर परस्पर मुलांच्या नावे करुन टाकले.हा अजब कारनामा मोगलाईला सुध्दा लाजविणारा ठरत आहे.श्रीमती सांळुखे ग्रामसेविका यांनी ग्रामपंचायत व गावातील शासकीय जागा म्हणजे आपली खासगी मालमता समजून आपल्याच मर्जीतल्या लोकांना बहाल केल्या आहेत.एवढे धाडस या महिला असलेल्या ग्रामसेविका सांळुखे मँडम यांना कुठून येते.यांच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण?कुणाच्या आशिर्वादाने हा उघड उघड शासनाच्या डोळ्यात धुळ झोकण्याचा प्रताप सांळुखे मँडम करीत आहेत.खरे तर याचीही उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.मालेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे साहेब कर्तव्यात कुठे कमी पडतात.की,त्यांचेवरही कुठला राजकीय दबाव दडपण येत आहे.याचा शोध आणि बोध शासन पातळीवर घेतला जाणे गरजेचे आहे.गंभीर स्वरुपाचे कागदोपत्री अफरातफर करुन व चौकशी अहवालात स्पष्टपणे ग्रामसेविका सांळुखे मँडमच्या कारकिर्दीचा उघड उघड पंचनामा करण्यात येऊनसुध्दा देवरे साहेब कार्यवाहीसाठी कोणत्या मुहुर्ताची वाट बघत आहेत.हा एक मोठाच सवाल उपस्थित होत आहे.ग्रामसेविका सांळुखे मँडमांच्या कारकिर्दीचा अजब गजब पंचनामा करीत असताना “युवा मराठा न्युज”च्या हाती भयानक असे धागेदोरे लागले आहेत.कायद्याची व कर्तव्याची भाषा सांगणाऱ्या सांळुखे मँडम यांनी व-हाणे गावात स्वतः च युवा मराठा न्युजच्या सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन करुन,आणि विधायक कामासाठी मागणी केलेली पाणपोईची जागा आजपर्यंत युवा मराठा न्युजला मिळू दिलेली नाही.सदर जागेचा प्रश्न नाहक तिष्ठत ठेवला.अन दुसरीकडे व-हाणे गावातीलच एका संस्थेच्या वाचनालयाला परस्पर शासकीय जागा नमूना नं.८ बनवून देताना शासकीय नियमांचा कुठलाही आधार घेतलेला नाही.किंवा ग्रामसभा अथवा मासिक मिटींगवर सदर वाचनालयाला जागा दिल्याचा उल्लेख नाही.फक्त आणि फक्त स्वतःच्या मनमानी व हिटलरशाही पध्दतीने ग्रामपंचायतीचा कारभार चालवून अन मर्जीतल्या लोकांनाच शासकीय लाभाच्या गोष्टीची खिरापत वाटण्यात आलेली आहे.शासनाच्या डोळ्यात धुळ फेकून अधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या व चौकशी अहवालाची आजपर्यंत अंमलबजावणी न करणाऱ्या गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे साहेब यांचे कार्यालयासमोर येणाऱ्या काही दिवसातच राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या माध्यमातून आमरण उपोषण छेडले जाईल.आणि सदरचे प्रकरण शेवटी न्यायासाठी महाराष्ट्राचे लोकआयुक्त व न्यायालयात दाखल केले जाईल आता संघर्षाशिवाय पर्याय नाही हेच अंतीम सत्य यानिमिताने पुढे येत आहे.

Previous articleमुलचेरा तालुक्यातील विजयनगर येथे अतिक्रमणधारक,गावातील समस्या संदर्भात।
Next articleअद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजा चिंतातुर, ▪️मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशा कडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.