Home गुन्हेगारी त्या लाल रंगाच्या गाडीत दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार मोबाईल,लाखोचा मुद्देमाल जप्त...

त्या लाल रंगाच्या गाडीत दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार मोबाईल,लाखोचा मुद्देमाल जप्त ( एल.सी.बी पथकांची धाड ,आरोपीवर कारवाई)

129

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0029.jpg

त्या लाल रंगाच्या गाडीत दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार मोबाईल,लाखोचा मुद्देमाल जप्त

( एल.सी.बी पथकांची धाड ,आरोपीवर कारवाई)    संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या बुरहानपुर रोडवरील निमखेडी फाटा नजीक दिनांक 16जुन रोजी संध्याकाळी पाच वाजता दरम्यान नाकाबंदी करीत असताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना एक संशयास्पद लाल रंगाची तवेरा गाडी येताना दिसली गाडीला थांबवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये परशुराम रमेश करवले वय तेवीस राहणार सोमवार पेठ कराड जिल्हा सातारा तर दुसरा आरोपी अभिजीत दिलीप येडगे वय 19 राहणार अहिल्यानगर मलकापूर तालुका कराड,दिनेश विजय बुरुंगले वय 22 वर्ष राहणार सातारा, तर चौथा आरोपी कुणाल बाबुराव हिवरे वय 23 राहणार रेहटे तालुका कराड जिल्हा सातारा हे चार आरोपी मिळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार मोबाईल यासह तवेरा गाडी एम एच 11 ए एल 9594 असा एकूण सहा लाख पंधराशे रुपये चा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस त्यांची कस्टडी ची मागणी करणार आहेत. याच तपासकामी सातारा जिल्हा एलसीबी चे पथक जळगाव जामोद येथे आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, उमेश शेगोकार, सचिन राजपूत, प्रशांत डांमरे यांनी ही कारवाई केलेली आहे. सदर हे आरोपी बुऱ्हाणपूर येथून देशी कट्टे घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये काही कटकारस्थान रचतात तर नाही ना? असा प्रश्न येथील एलसीबी पथकाला पडला असावा त्यामुळेच जळगाव जामोद येथे हे पथक दाखल झाले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात त्यांच्या या कारवाईची कौतुक होत आहे.

Previous articleकै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे १००% निकाल
Next articleविविध विकास कामाबाबत घेतला आढावा, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही खा.अशोकजी नेते.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.