आशाताई बच्छाव
शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने कृष्णूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नायगाव
नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील शेतकरी स्वतःच्या शेतातील केरकचरा वेचण्यासाठी निळेगव्हाण शिवारात गेले होते. त्यांचा विद्युतप्रवाह असलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने ते जागीच दगावल्याची घटना घडली असून याबाबत कुंटूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील शेतकरी विश्वंभर माणिकराव चेरकेवाड वय ६० हे स्वतःच्या निळेगव्हाण शिवारातील शेतातील केर कचरा वेचून बाहेर काढण्यासाठी शेतात गेले होते, शेताला आसलेल्या काटेरी कुंपणात विद्युतप्रवाह उतरल्याने व विश्वंभर चेरकेवाड यांचा विद्युतप्रवाह असलेल्या काटेरी कुंपणाला हाताचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून ते जागीच मरण पावल्याची घटना आज दिनांक १३ जून रोजी दुपारी घडली
सदरची दुर्दैवी घटना अचानक घडली असल्यामुळे घडलेल्या घटनेमुळे कृष्णूर परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात. असून सादरील घटनेचा पंचनामा करुन कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार एस एम कुमरे व पॉका अशोक घुमे यांनी केला. विश्वंभर यांच्या पश्चात तीन मुल व पत्नी असल्याचे गावकऱ्यानी सांगितले आहे.






