Home नाशिक पिंगळवाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवराज्याभिषेक उत्सव साजरा.

पिंगळवाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवराज्याभिषेक उत्सव साजरा.

131

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220614-WA0040.jpg

पिंगळवाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शिवराज्याभिषेक उत्सव साजरा.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे युवा मराठा न्युज
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार दिनांक १३.६.२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला.
मराठी नव वर्षे दिनदर्शिके प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पिंगळवाडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा धर्माचार्य प्रमुख परीमल जोशी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी तालुका कार्यवाहक गणेश वाघ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तालुका प्रचारक अजय पाटील उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी परिमल जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्याचा उल्लेख केला. तालुका कार्यवाहक गणेश वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विषयी तरुणांमध्ये संबोधन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार परीमल जोशी व गणेश वाघ यांना अर्पण केला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक केदा भामरे,कृष्णा भामरे, बाजीराव भामरे, होते याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, गावातील तरुण, नागरिक,महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleकंचनपूरला पंतप्रधान मोदीच्या आठ वर्षातील कर्तबगारीचा आढावा
Next articleशेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरल्याने कृष्णूर येथील शेतकऱ्यांचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.