Home नांदेड देश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान – कर्नल एम रंगाराव

देश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान – कर्नल एम रंगाराव

83
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220613-WA0044.jpg

देश सेवेकरिता राष्ट्रीय छात्र सेनेचे महत्त्वपूर्ण योगदान
– कर्नल एम रंगाराव

▪️एन सी सी वार्षिक प्रशिक्षण
शिबिराचा शुभारंभ
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड, : देशाच्या सेवेमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे योगदान महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासक्रमासमवेत देश सेवेचे, स्वरंक्षणाचे, देश रक्षणाचे धडे देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय छात्र सेनेने केले आहे. देशसेवेचे व्रत अंगीकारून राष्ट्रीय छात्र सेनेचे युवक भारतीय सैन्यात, पोलीस राज्य राखीव दलात, केद्रीय राखीव दलात चांगली भूमिका व कर्तव्य बजावत असल्याचे गौरवोद्गार कर्नल एम रंगाराव यांनी काढले.

महाराष्ट्र एनसीसी बटालियन नांदेड यांच्या वतीने येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रांगणात राष्ट्र
छात्रसैनिकां करिता वार्षिक
प्रशिक्षण शिबिर आयोजित
करण्यात आले. या शिबिराचे
उद्घाटन 52 महाराष्ट्र एनसीसी
बटालियन चे कमांडिंग
अधिकारी कर्नल एम रंगाराव
यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी एनसीसी प्रशासकीय अधिकारी ले. कर्नल वेत्रिवेलू
एस उपस्थित होते. या शिबिरात हिंगोली, परभणी वनांदेड जिल्ह्यातील 450
एनसीसी विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.

दिनांक 12 जून 2022 ते 21
जून 2022 या दहा दिवसाच्या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ उध्दव भोसले
व क्रीडा संचालक डॉ.
विठ्ठलसिंह परिहार यांच्या संयुक्तप्रयत्नाने प्रशिक्षणार्थींना भव्य विद्यापीठ प्रांगणात प्रशिक्षणाचालाभ घेण्याचे भाग्य लाभले आहेअसे मनोगत याप्रसंगी कमान
अधिकारी यांनी व्यक्त केले.

या शिबिरात छात्र सैनिकांना
ड्रील, शस्त्र कवायत, फायरिंग, नकाशा अध्ययन , अंबुश, पेट्रोलयासोबत आपातकालीन, आत्मरक्षा, नागरी सुरक्षा या
विविध विषयासह भारतीय
सैन्याचा इतिहास याविषयी
सखोल मार्गदर्शन करण्यात
येणार आहे. शिबिरार्थी यांना
सैन्य प्रशिक्षण हेतू फायरिंग
सराव व स्पर्धा चे आयोजन
करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांकरिता
अल्पोहार व भोजन यांची
व्यवस्था एन सी सी
निदेशालय , बटालियनच्या
वतीने करण्यात आलेली आहे.

या शिबिराचे प्रशिक्षण शिस्तबद्धव वेळेनुसार करण्यासाठी 52
महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग एम रंगाराव, प्रशासकीय
ऑफिसर ले. कर्नल वेत्रिवेलू एसयांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी मेजर
पंढरीनाथ घुगे, सुभेदार मेजर
ललित मेहता, लेफ्टनंट बालाजीठाकूर, लेफ्टनंट काजी सय्यद
लेफ्टनंट विजयकुमार देशमुख सेकंड
ऑफिसर मुनेश्वर ,फर्स्ट
ऑफिसर सवडतकर अनिल,
थर्ड ऑफिसर रघुनाथ राठोड,
थर्ड ऑफिसर प्रताप केंद्रे,
सुभेदार गोपाल सिंग, सुभेदार जमनसिंग, सुभेदार गोपाल सिंगसुभेदार लाल मोहम्मद,
बी एच एम सुनील कुमार,
हवालदार अरविंद कुमार, हवालदार संजय, हवालदार
संदीप, हवालदार सिद्धाप्पा, शेख अन्सारी, पवार राजू , विठ्ठल गवळी आदी
परिश्रम घेत आहेत.

Previous articleपंढरी आषाढी वारी मध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रणास बंदी
Next articleजिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here