Home बुलढाणा भरतीत, कार्यरत पोलिसांच्या पाल्यानाही आरक्षण द्या ! पोलीस बॉईज असोसिएशनचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,...

भरतीत, कार्यरत पोलिसांच्या पाल्यानाही आरक्षण द्या ! पोलीस बॉईज असोसिएशनचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालकांना साकडे!!

159

आशाताई बच्छाव

IMG-20220609-WA0020.jpg

भरतीत, कार्यरत पोलिसांच्या पाल्यानाही आरक्षण द्या ! पोलीस बॉईज असोसिएशनचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महासंचालकांना साकडे!! जिल्हाधिकारीमार्फत दिले निवेदन
ब्युरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बुलडाणा
बुलडाणा:-: पोलीस भरतीत सेवेत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठीही आरक्षण असावे ही न्यायोचित मागणी महाराष्ट्र स्टेट पोलीस बॉईज असोसिएशनने थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री , पोलीस महासंचालक यांच्याकडे रेटली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे या मान्यवरांना साकडे घालण्यात आले.

पोलीस भरतीत पोलीस बॉईज ला आरक्षण असले तरी ती तरतूद फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी आहे. मात्र ५८ व्या वर्षी कर्मचारी निवृत्त होतात, तेंव्हा बहुतेक पाल्यांची नोकरीविषयक वयोमर्यादा संपलेली राहते.

यामुळे कागदोपत्री ३ टक्के आरक्षण असूनही त्यांची नोकरीची संधी हुकते अन जीवन अंधारमय होते. त्यामुळे सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी देखील आरक्षण असावे आणि आरक्षण ५ टक्के करावे या न्यायोचित मागण्यासाठी पोलीस बॉईज प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या प्रति पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांनाही देण्यात आल्या आहे.

Previous articleदबा धरुन बसलेल्या तीन संशयीत पोलीसांच्या ताब्यात
Next articleअखेर संग्रामपूर तालुक्यात रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.