Home परभणी दबा धरुन बसलेल्या तीन संशयीत पोलीसांच्या ताब्यात

दबा धरुन बसलेल्या तीन संशयीत पोलीसांच्या ताब्यात

125

आशाताई बच्छाव

IMG-20220609-WA0019.jpg

दबा धरुन बसलेल्या तीन संशयीत पोलीसांच्या ताब्यात

शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो चीफ)

जिंतूर (परभणी):-येथील पोलीसांच्या पथकाने कोम्बींग ऑपरेशन दरम्यान दबा धरुन बसलेल्या तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. सदर इसमांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि टोपाजी कोरके, पोलीस कर्मचारी भुसारे, जोगदंड, वाकळे, हाके यांचे पथक जिंतूर शहरामध्ये रात्रगस्त घालत होते. या पथकाला तीन संशयीत मोटार सायकलने वेगाने जात असल्याचे दिसून आले. पोलीसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता संबंधित इसमांजवळ एक चाकू मिळून आला. संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. साहिल खान सादेक खान पठाण, अदनान खान याहिया खान पठाण, आवेज खान पठाण यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.