Home नांदेड देगलूर शहरातील इंग्रजी शाळांची चौकशी करा, भागवत पाटील सोमूरकर

देगलूर शहरातील इंग्रजी शाळांची चौकशी करा, भागवत पाटील सोमूरकर

159

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0022.jpg

देगलूर शहरातील इंग्रजी शाळांची चौकशी करा, भागवत पाटील सोमूरकर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलुर शहरातील इंग्रजी शाळांमधील अनियमितता, आरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार शहरात वाढल्याने इंग्रजी शाळांची तपासणी करावी. ह्या मागणीचे निवेदन भागवत पाटील सोमुरकर यानी उपजिल्हाधिकारी देगलुर याना देण्यात आले आहे.आरटीई अंतर्गत मुलांना मोफत प्रवेश आसताना यात अनेक शाळांमध्ये शासन दिलेल्या नियमांची पायमल्ली करत आसल्याचे पालकाकडुन शिवसेना कार्यालया कडे तक्रारी येत आहेत, इंग्रजी शाळे कडून नियमाची पायमल्ली करत आहेत आसे निर्देशनास येत आहेत,मागील काही वर्षात इंग्रजी शाळांची संख्या वाढली. बाल हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देणे बंधन कारक आहे, अनेकदा प्रवेश देण्यास शाळांकडून टाळाटाळ केली जाते. त्यासह अनेकदा शुल्काबाबतच्या तक्रारी ही समोर येतात. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या तपासणी करायला पाहीजे, तपासणीमध्ये शाळेची मान्यता, शाळा सुरू करताना त्याची परवानगी कोणत्या ठिकाणी घेतली आहे, स्थंलांतर केले तर ते नियमात आहे की नाही, निकषांची पूर्तता केली जाते की, नाही. मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये २५ टक्के जागांवर निश्चित प्रवेश देण्यात आले किंवा नाही. भौतिक सुविधा याबाबत समितीकडून तपासणी केली गेली पाहिजे, मोफत प्रवेश प्रक्रियेत अनेक शाळांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहेत. अनेकदा पालकांकडून शुल्कवाढीच्या तक्रारी केल्या जात आहेत. या सर्व बाजुचा विचार करुन शहरातील सर्व इंग्रजी शाळांची चौकशी करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन शिक्षण मंत्री व उपजिल्हाधिकारी देगलुर याना देण्यात आले आहे. या निवेदनावर धनाजी भाऊ जोशी यांच्यां सह इतर शिवसैनिकांचे सह्या आहेत.

Previous articleसाईनगर तांड्याची सून गोकर्णा राठोड देश सेवेसाठी सीआरपीएफ मध्ये
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर वतीने नूतन गट विकास अधिकारी देशमुख साहेब यांचा सत्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.