Home नांदेड ☆पत्रकार सय्यद मुजीब यांना `राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार` प्रदान

☆पत्रकार सय्यद मुजीब यांना `राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार` प्रदान

139

आशाताई बच्छाव

IMG-20220606-WA0081.jpg

☆पत्रकार सय्यद मुजीब यांना `राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार` प्रदान
☆आमदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथील कै.नागोराव पाटील बेटमोगरेकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पत्रकार सय्यद मुजीब यांना या वर्षीचा पत्रकारितेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आघाडीची वृत्तवाहिनी एन टीव्ही न्यूज मराठी च्या माध्यमातून शेतकरी , शेतमजूर सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय, व क्रीडा अशा विविध क्षेत्रात जनजागृतीवर उल्लेखनीय कार्याबद्दल दिनांक 26 मे 2022 रोजी एन टीव्ही न्यूज मराठी वृत्त वाहिनीच्या विसाव्या वर्धापन दिनी मुख्य संपादक इक्बाल शेख पारनेर चे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके अहमदनगर चे आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते कोठारी फाउंडेशनचे श्री कोठारी साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
पत्रकार सय्यद मुजीब हे कै.नागोराव पाटील बेटमोगरेकर बहुद्देशीय सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची कास धरून गोरगरीब ,
शेतकरी ,शेतमजूर, जनतेच्या तळागाळातील प्रश्नांना वाव देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहत त्यांनी संस्थे च्या व पत्रकारीतेच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना मागील काळामध्ये पत्रकारितेचा अभिमान पुरस्कार रत्न पुरस्कार आधी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले पत्रकार सय्यद मुजीब यांनी संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून लोकहिताचे काम करून गोरगरीबांना मदत केली अल्पकाळात पत्रकारितेच्या क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकीक करत अनेक समस्यांना वाचा फोडून आणि शासन दरबारी न्याय मिळवून दिला आहे. सय्यद यांना यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रावरून मोठ्या प्रमाणावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकारीतेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने समाजातील तळागाळातील शोषित आणि गरजू लोकांसाठी काम करण्याची मला नवी प्रेरणा आणि उत्साह मिळाला युवा वर्गांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या शक्ती आणि बुद्धीचा वापर समाजहितासाठी व विधायक कार्यासाठी वापर करावा जेणेकरून आपण इतरांची प्रेरणा बणु चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून करा म्हणजे इतर लोक प्रेरणा घेऊन या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होतील असे आवाहन याप्रसंगी पत्रकार सय्यद मुजीब यांनी केले.

Previous articleसेवा,सुशासन आणी गरीब कल्याण पर्व निमीत्ताने महाराष्ट्रातील 75 ठिकाणी भगवान बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम,रॅली,मेळावे होणार
Next articleयुवकांनो आम आदमी पक्षात प्रवेश करा…कैलाश शर्मा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.