Home गडचिरोली सेवा,सुशासन आणी गरीब कल्याण पर्व निमीत्ताने महाराष्ट्रातील 75 ठिकाणी भगवान बिरसा मुंडा...

सेवा,सुशासन आणी गरीब कल्याण पर्व निमीत्ताने महाराष्ट्रातील 75 ठिकाणी भगवान बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम,रॅली,मेळावे होणार

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20220605-WA0034.jpg

सेवा,सुशासन आणी गरीब कल्याण पर्व निमीत्ताने महाराष्ट्रातील 75 ठिकाणी भगवान बिरसा मुंडा पुण्यतिथी कार्यक्रम,रॅली,मेळावे होणार

आम.डाॅ. अशोक जी उईके.प्रदेशाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकारच्या 8 वर्ष पुर्ती निमीत्ताने सेवा,सुशासन आणि गरीब आल्याण पर्व अंतर्गत भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र च्या वतीने महाराष्ट्रातील 51 विधानसभेतील 75 आदिवासी बहुल ठिकाणी 9 जुन भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीि निमीत्ताने भव्य रॅली,आदिवासी मेळावा.घेण्या बाबत जे प्रदेश स्तरीय नियोजन केले आहे.ते सर्व मेळावे घेउन मा.नरेंद्रजी मोदी यांनी जनजाती/आदिवासी समाजा करीता बजेट मध्ये 3 लाख 42 हजार 989 करोड निधि दिला जो काॅग्रेस सरकारने आदिवासी करीता दिलेल्या निधीच्या 72% जास्त आहे.भारतीय संविधान अनुच्छेद 275 अन्वये 1 लाख 2 हजार करोड निधि दिला.भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर “””जनजाती/आदिवासी गौरवदिवस””” जाहिर केला जे स्वतंत्र्या नंतर पहिल्यांदाच आहे.देशाच्या अम्रुतमोहोत्सव वर्षा निमीत्ताने देशातील 75 आदिवासी शहिदांची स्मारके व संग्रहलय तयार होत आहेत.आदिवासी समाजाच्या 2 महिलांना मा.राज्यपाल बनविले आहे.अनेक गरीब आदिवासी महिलाना पद्मश्री,पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले या सर्व कार्याची आदिवासी जनतेत चर्चा करा असे आवाहन मा.आम.डाॅ. अशोक जी उईके.प्रदेशाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र तथा मा.आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र यानी केले
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र च्या वतीने आज प्रदेश पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष,शहर अध्यक्ष,खासदार,आमदार,मा.आमदार,75 कार्यक्रम संयोजक यांची वर्चुवल बैठक घेण्यात आली होती यात ते समारोपीय मार्गदर्शन करताना केले.बैठकीत सविस्तर आढावा मा.किशोरजी काडकर प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र एस.टि.मोर्चा महाराष्ट्र यानी घेतला
बैठकीत श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन),भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.मा.डाॅ. हेमंत जी सावरा प्रदेश सरचिटणीस तथा संयोजक,श्री सुदर्शन जी सिंधे प्रदेश चिटणीस तथा मराठवाडा प्रभारी यांची हि भाषणे झालीत.बैठकीत प्रदेश पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष,शहर अध्यक्ष,संयोजक उपस्थित होते

Previous articleस्वर्गवासी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांना समर्पित मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न.
Next article☆पत्रकार सय्यद मुजीब यांना `राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार` प्रदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here