Home नांदेड जादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा – अखिल भारतीय छावा...

जादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा – अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी.

136

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0031.jpg

जादा दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कार्यवाही करा – अखिल भारतीय छावा संघटनेची मागणी.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – सद्याला शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी
खते व बी. बियाणे घेण्यासाठी गर्दी करित असतानाच दुसरीकडे मात्र कृषी दुकानदारांकडून खते व बियाणे चढ्या दराने विक्री करीत असल्याचे समोर आले आहे .
केरुर ता. मुखेड येथील युवा शेतकरी भाऊसाहेब हरीचंद्र पाटील शिंदे यांनी मुखेड येथील
ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, सुनिल कृषी ,व बालाजी कृषी सेवा केंद्र या दुकान मालकांनी मनमानी करुन खतांची ज्यादा भावाने विक्री केली. प्रत्यक्ष भाऊसाहेब हरिशचंद्र शिंदे रा.केरुर हे ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र नवा मोंढा मुखेड येथे खत घेण्यास गेले असता DAP खत सुमारे पंधराशे दहा रुपये (१५१० रु ) भावाने पैशाची मागणी करण्यात आली. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने मुखेड तहसीलदार यांना निवेदन देवून चढ्यादरांने खतांची विक्री करणाऱ्या संबंधित कृषि दुकानदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी व त्यांचा दुकान परवाना रद्द करावे अशी मागणी करण्यात आली असून या तक्रारीत छावा संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गिरिधर पाटील केरुरकर , भाऊसाहेब हरीचंद्र पाटील शिंदे, श्रीनिवास पाटील शिंदे . रविकांत मोतीराम वाघमारे यांचा समावेश आहे.

Previous articleरामनगर भौरी मळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Next articleरामदास पाटील सुमठाणकर यांना साम टीव्ही चा ग्लोबल अचिव्हर्स अवार्ड जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.