Home नाशिक कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती….

कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती….

174

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0064.jpg

कळवणमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती….

नयन शिवदे, सटाणा विशेष प्रतिनिधी /बाळासाहेब निकम कळवण                                         नाशिक जिल्ह्यातील कळवण इथं भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मारुती अल्टो कार आणि ट्रॅक्टरची धडक झाली आहे.
या भीषण अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या कळवण इथं मुळणे बबापुर गावाच्या शिवारात हा अपघात घडला आहे. मारुती अल्टो आणि ट्रॅक्टर यांच्यात धडक झाली आहे.

कारच्या धडकेनंतर ट्रॅक्टर कारवर पलटी झाले आहे.या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळाकडे रवाना झाले आहे