Home बुलढाणा बायकोच्या विरोधात नवरा बसला उपोषणाला!कारण वाचून तुम्ही म्हणाल “असं कुठ असत का”!...

बायकोच्या विरोधात नवरा बसला उपोषणाला!कारण वाचून तुम्ही म्हणाल “असं कुठ असत का”! नांदूऱ्यातील प्रकार

134

राजेंद्र पाटील राऊत

बायकोच्या विरोधात नवरा बसला उपोषणाला!कारण वाचून तुम्ही म्हणाल “असं कुठ असत का”! नांदूऱ्यातील प्रकार

नांदुरा( ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा): नवरा बायकोत होणारे भांडण हा काही नवा प्रकार नाही. घरात भांड्याला भांडे लागतातच पण म्हणून बायकोच्या विरोधात थेट कुणी उपोषणाला बसल्याचे तुम्ही पाहिले नसेल..मात्र नांदूऱ्यात एक नवरोबा चक्क बायकोच्या विरोधात उपोषणाला बसलाय..घटस्फोट न घेता माझ्या बायकोने दुसरे लग्न केले, त्यामुळे तिच्याविरुद्ध कारवाई केली अशी मागणी या नवरोबाने केली आहे.

नांदुरा तालुक्यातील राजनगर येथील गणेश मुरलीधर वडोदे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन दिले. पत्नीने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले त्यामुळे तिच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने ते काल, २६ मेपासून नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

Previous articleरोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Next articleहस्त कलेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लघुउद्योगांचे पुनर्जीवन करणे गरजेचे -आ.धर्मराव बाबा आत्राम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.