Home गडचिरोली अहेरी-वांगेपल्ली मधील ले आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करा..!!

अहेरी-वांगेपल्ली मधील ले आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करा..!!

141

राजेंद्र पाटील राऊत

अहेरी-वांगेपल्ली मधील ले आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करा..!!

शासनाने केलेल्या बांधकामाची ले आऊटधारकांकडून खर्च वसुल करा..!!

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :- अहेरी-वांगेपल्ली मधील ले आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करून शासनाने केलेल्या बांधकामाची ले आऊटधारकांकडून खर्च वसुल करण्यात यावा. अशी मागणी जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
आपल्या उपविभाग अंतर्गत अहेरी-वांगेपल्ली येथील सन २००१ ते आजपावेतो टाकण्यात आलेली संपूर्ण ले-आऊटची चौकशी करण्यात यावी. आपल्या उपविभाग अंतर्गत शासनाने जे अकृषक जमीनीचा आदेश पारीत केला.त्या आदेशामध्ये जे नियम व अटी लागू करण्यात आले होते. त्या आदेशाच्या उल्लंघन करुन आपल्या उपविभागातंर्गत मौजा अहेरी-बांगेपल्ली येथे नियमाबाहय ले-आऊट टाकण्यात आलेले आहे..!!

सदर ले-आऊटमध्ये भुखंड धारकांनी खुली जागा अंतर्गत रस्ते व रस्त्याच्या बाजुची गटारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमाणकाप्रमाणे संबंधीत ले-आऊट विकसीत करून नगर पंचायत, अहेरी यांच्या ताब्यात दयाचे होते, परंतु तसे न करता शासन कडून आलेली निधीच्या वापर करुन रस्ते, नाले, गटारेची बांधकाम करण्यात आले. सदर ले-आऊट नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची सखोल चौकशी करुन ले-आऊटधारकांकडुन शासनाकडून झालेल्या खर्च वसुल करण्यात यावी व ले -आऊटधारकांवर सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे..!!

Previous articleकेवळ आर्थिक स्वार्थासाठी गडचिरोलीचे मेडिकल कॉलेज रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleपुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ‘चाचा’ला मरेपर्यंत जन्मठेप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.