राजेंद्र पाटील राऊत
आमदार डॉ देवराव जी होळी यांनी घेतला विविध विभागांच्या विकासात्मक कामांचा आढावा।
एम एस ई बी, आरोग्य विभाग , जिल्हा नियोजन विभाग, आदिवासीं बांधकाम विभाग यांचा घेतला आढावा
मागील २ वर्षांच्या कामांचा आढावा तर २०२२ या वर्षाचे करावयाचे नियोजन याकरिता बैठकीचे आयोजन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील मागील २ वर्षातील केलेल्या कामांचा आढावा तर २०२२ मध्ये विकासात्मक कामांचे नियोजन याबाबतचा आढावा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली सर्किट हाऊस येथील नियोजित बैठकीच्या माध्यमातून घेतला. यावेळी एम एस ई बी, आरोग्य विभाग , जिल्हा नियोजन विभाग, आदिवासीं बांधकाम विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मागील दोन वर्षातील विकास कामांबाबत माहिती जाणून घेतली. मागील दोन वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात किती कामे पूर्ण करण्यात आली.? मंजुर कामापैकी अपूर्णावस्थेत किती कामे राहिलीत? त्यात आलेल्या अडचणी जाणून घेतल्या. अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामांच्या संदर्भात पुढे काय करता येईल व त्यासाठी आपणाकडून काय प्रयत्न होईल व त्याकरिता माझे सहकार्य काय लागेल याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या पुढील कामांचे नियोजन २०२२ मध्ये घेण्यात यावे याबाबतचे निर्देशही त्यांनी या बैठकीच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.