Home नांदेड खत-बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा.शिवशकर पाटील

खत-बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा.शिवशकर पाटील

121

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220518-WA0013.jpg

खत-बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा.शिवशकर पाटील
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

पेरणीपूर्व व पेरणी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना लागत असलेल्या खत-बियाण्यांची गरज लक्षात घेऊन,खत-बियाणे विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते.आणि त्यातून चढ्या दराने खत-बियाणे विकली जातात.यासोबत बाजारात खलक्या प्रतीची व अप्रमाणित खत बियाणे मोठ्या प्रमाणात विकली जातात.हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजे.अशा खत-बियाणे विक्रेत्यावर कार्यवाही झाली पाहिजे.यासाठी पथकाची नेमणूक करा व यंत्रणा राबवा,अशी मागणी दि.18 मे रोजी कृषी अधिकारी विशाल बिऱ्हाडे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.यावेळी कृषी मंडळ अधिकारी भारत नांगरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित खत बियाणे उपलब्ध करून देणे व बाजारातील हलक्या व अप्रमाणित खत बियाण्यांवर कार्यवाही करणारी यंत्रणा राबली पाहिजे,अशी मागणी निवेदनात केली आहे.

Previous articleवृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षा रोपण
Next articleगार अकोले येथे आम् आदमी पार्टीचे कॉर्नर सभा सपंन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.