राजेंद्र पाटील राऊत
वनमजूर, वनरक्षक तसेच वनपाल यांना वेळेवर मासिक वेतन मिळणार –
रंगनाथ नाईकडे- मुख्य वनसंरक्षक नागपूर,(युवा मराठा आँनलाईन न्युज नेटवर्क)
आज दिनांक 19/5/2022 रोजी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांच्या अध्यक्षतेखली तसेच श्री. रंगनाथ नाईकडे मुख्य वनसंरक्षक नागपूर वन वृत्त व श्री. भारत हाडा उपवनसंरक्षक नागपूर वन विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत नागपूर वन वृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडी अडचणी व समस्यांचे निराकरण करणे संबंधी हरिसिंग सभागृह सेमिनरी हिल्स नागपूर येथे पार पडली. प्रसंगी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांनी सभागृहात उपस्थित संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे वतीने मानचिन्ह वा शाल श्रीफळ देऊन मा. श्री. रंगनाथ नाइकडे मुख्य वनसंरक्षक यांचा सभेच्या सुरुवातीला सत्कार केला. तसेच श्री. भरत हाडा उपवनसंरक्षक नागपूर यांचे संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले.
सभेमध्ये संघटना द्वारे सादर केलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सर्व अडी अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक यांनी केले. त्याचप्रमाणे नागपूर मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी संघटना व विशेषतः संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांनी पुढाकार घेण्याचे जाहीर केले. प्रसंगी त्यांनी केवळ स्पर्धा परीक्षाच नाही तर वन विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे मुख्य वनसंरक्षक यांचे उपस्थितीत सर्व पदाधिकारी व सदस्यांना आश्वासन दिले.,
सभेमध्ये वनमजूर, वनरक्षक तसेच वनपाल यांचे मासिक वेतन, वनरक्षक ते वनपाल पदोन्नती, सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत,प्रवास भत्ता, कॅश लेस वैद्यकीय सुविधा, वन्य जीव विभागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी, नियमित शासकीय गणवेश पुरवठा, प्रलंबित विभागीय चौकशी प्रकरणांचा निपटारा, गस्तिकरिता शासकीय वाहन पुरवठा, विभागीय स्पर्धा परीक्षा, वन कल्याण निधी, नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणी, तपासणी नाके व निवास स्थान यांची दुरुस्ती, वस्ती गृह इत्यादी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रसंगी नागपूर वन वृत्ताचे अध्यक्ष श्री. सतिश गडलिंगे, सचिव श्री. आनंद तिडके, नागपूर वन विभागाचे अध्यक्ष श्री. कैलास सानप, श्री. सुनील भोयर, श्री. उमेश बनगर, श्री. दिगंबर गुंडेवार व नागपूर वन वृत्त, नागपूर वन विभाग, वर्धा वन विभाग, भंडारा वन विभाग, गोंदिया वन विभागातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच महिला प्रतिनिधी व सदस्य उपस्थित होते.