Home नाशिक कळमदरेत आज हरिनाम सप्ताहाची उत्साही वातावरणात सांगता           

कळमदरेत आज हरिनाम सप्ताहाची उत्साही वातावरणात सांगता           

239

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220515-WA0007.jpg

कळमदरेत आज हरिनाम सप्ताहाची
उत्साही वातावरणात सांगता                                            (सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
चांदवड-तालुक्यातील कळमदरे गावी स्वानंद सुखनिवासी वै.ह.भ.प.संत श्रीस्वामी यादव महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ जयंतीदिना निमिताने आयोजीत केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी गाथा पारायण सोहळ्याची आज मोठया उत्साहात सांगता समाप्ती होणार आहे.
रविवार दिनांक ८ मे पासून सुरु झालेल्या या धार्मिक हरिनाम सप्ताहाची आज मोठया उत्साही व जल्लोषपुर्ण वातावरणात सांगता समाप्ती होणार आहे.गत दोन वर्षापासून कोरोना महामारी संकटामुळे या सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध इलेले होते.त्यामुळे यावर्षी साज-या झालेल्या कार्यक्रमातून भाविक,ग्रामस्थ व तरुणांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण दिसून आले.गत आठवडाभरापासून सुरु असलेल्या या हरिनाम सप्ताह कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध नामांकीत किर्तनकारांनी हजेरी आपली सेवा दिलेली आहे.तर आज रविवार १५ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत दिंडी सोहळ्याची मिरवणूक होऊन सकाळी १०.३० वाजता ह.भ.प.रमेश महाराज गांगुर्ड यांचे काल्याचे किर्तन होईल.त्यानंतर महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता समाप्ती होईल,अशी माहिती कळमदरे ग्रामस्थांनी दिली आहे.

Previous articleसोनाळा मध्ये  आमदार डॉ संजय कुटे ध्येय नेतृत्वात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न
Next articleनक्षल्यांनी केली युवकाची हत्या।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.