Home बुलढाणा यावर्षी कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथील विद्यार्थ्यांनी युवा मोहत्सव अमरावती...

यावर्षी कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथील विद्यार्थ्यांनी युवा मोहत्सव अमरावती येथे विविध स्पर्धेत घेतला सहभाग

130

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220429-WA0042.jpg

यावर्षी कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथील विद्यार्थ्यांनी युवा मोहत्सव अमरावती येथे विविध स्पर्धेत घेतला सहभाग                                                                               संग्रामपूर/रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज

मागील गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे कोणताच युवा महोत्सव अमरावती विभागाकडून न झाल्यामुळे या वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विभागाकडून युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक २२ ते २५ एप्रिल या कालावधीत ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती या ठिकाणी आयोजित केले होते यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट ब. या महाविद्यालयातून विविध स्पर्धेमध्ये प्रवेशिका भरण्यात आल्या होत्या त्यामध्ये दिनांक 22 एप्रिल ला वकृत्व स्पर्धेमध्ये वैष्णवी लाहोरकर तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्राजक्ता ढगे यांनी सहभाग घेतला होता तसेच दिनांक 23 एप्रिल ला झालेल्या समूहगान स्पर्धेमध्ये वैष्णवी लाहोरकर,रूपाली राजनकर, गायत्री सातव, कांचन तायडे, शितल मेहेंगे, आरती भोजने, शिवा डांगे, रोशन राऊत, गौरव अरबट. या 9 विद्यार्थ्यांचा समावेश होता, तर दिनांक 24 एप्रिल झालेल्या नकला या स्पर्धेमध्ये रूपाली राजनकार तर मेहंदी स्पर्धेमध्ये स्नेहल उकडे॔ या विद्यार्थ्यांचा समावेश होता. युवा महोत्सवाचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कोरडे सर आणि सदस्य प्राध्यापक नागेश इंगळे सर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना युवा महोत्सवात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन देऊन त्यांना युवा महोत्सवाच्या स्पर्धेमध्ये सहभागी करण्याकरिता अमरावतीया ठिकाणी नेले व कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous article7 वर्षीय अलिना ने ठेवला मोठा रोजा
Next articleए.बी डान्स अकॅडमी गडचिरोली प्रस्तुत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी.. मान. खा.अशोकजी नेते यांची उपस्थिती..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.