Home पुणे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची...

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट

153

राजेंद्र पाटील राऊत

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट

पिंपरी. चिंचवड उमेश पाटील प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. १७,रविवार) खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप, विजूशेठ जगताप यांच्याशी चर्चा करून धीर दिला, तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी आणि लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले आहे, पिंपरी चिंचवड शहरात आले की लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी त्यांचे जाणेयेने असायचे, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांच्यावर अनेक वर्षे पक्ष वाढीची जबाबदारी दिली होती, आणि जगताप यांनी पक्ष वाढवत ती चांगल्या प्रकारे पार पडली होती.
त्यामुळे आपला एक सारथी आजारी असल्याचे कळताच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. व सर्व कार्यकर्त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश दादा लांडगे हेही होते.