Home गडचिरोली माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे “जिवन सन्मान” पुरस्काराने सन्मानित भारतीय मानवाधिकार परिषद...

माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे “जिवन सन्मान” पुरस्काराने सन्मानित भारतीय मानवाधिकार परिषद आयोगाकडून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

248

राजेंद्र पाटील राऊत

माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे “जिवन सन्मान” पुरस्काराने सन्मानित

भारतीय मानवाधिकार परिषद आयोगाकडून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

गडचिरोली–,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्थानिक पत्रकार भवन येथे दि. १३ मार्च रोजी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जीवन सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांचा मानवाधिकार परिषदेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश मोकाशी यांच्या हस्ते जीवन सन्मान पुरस्कार देवुन सन्माणित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अथिति म्हणून श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे,भारतीय मानवाधिकार परिषद संचालिका प्रीती मोकाशी,प्रा. डॉ. सविता सादमवार,माजी प्राचार्य पंडित पुडके,ऑड. कविता मोहोरकर उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम,कोराना काळात झोपडपट्टीतील गरीब,लघू उदयोग धंदे,सायकल रिक्षा व घरगुती काम करणाऱ्या कामगार,महिला मजूर यांना मदतीता हात,जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्नांच्या नातेवाईकांना मोफत भोजन,गडचिरोली शहरात व जिल्ह्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत. (उदा.कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना मदत तसेच या महिलांच्या मुला-मुलींच्या लग्नकार्यात सहकार्य करणे) असे अनेक उल्लेखनीय कार्य केलेली आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना मेश्राम यांनी केले तर आभार भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी मानले.

Previous articleशेतीपंप वीज कनेक्शन कट मोहीम थांबवण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा
Next articleदोन दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.