Home गडचिरोली दोन दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत।

दोन दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत।

324
0

राजेंद्र पाटील राऊत

दोन दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळला विहिरीत।
गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव येथील दोन दिवसापासुन बेपत्ता असलेल्या 27 वषिंय युवकाचा मृतदेह दि.15़़ मार्च ला सकाळच्या सुमारात नवेगाव बस स्टॉप जवळील विहीरीत आढळुन आला.
हेमंत रामचंद्र कोरडे वय 27 वषि्य नवेगाव कॉम्प्लेक्स ता.जी.गडचिरोली असे मृतक युवकाचे नाव आहे
हेमंत पहाटे 1 वाजताच्या सुमारास घरुन गेला पंरन्तु तो परत न आल्याने घरच्यांनी शोधा शोध सुरु केली.कुटुबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात केली.पंरन्तु दोन दिवस त्याचा शोध लागला नाही.
अखेर मंगळवारी सकाळी घरापासुन काही अंतरावर असलेल्या विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला.हेमंत टि पॉईन्ट चौकात पानठेला चालवित होता.पंरन्तु नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम चालविल्याणे त्याचा वेवसाय काही दिवसापासुन बंद होता.यामुळे तो विवंचनेत असल्याचे कळते.हेमंत च्या वळिलाचे काही वर्षा अगोदर निधन झाले असुन तो एकुलता एक मुलगा होता.या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला
हेमंतच्या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट असुन या घटनेचा पुढिल तपास गडचिरोली पोलिस करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here