Home गडचिरोली लगाम धान खरेदी केंद्रांतर्गत ८७ शेतकऱ्यांची ७० लाखाने फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास...

लगाम धान खरेदी केंद्रांतर्गत ८७ शेतकऱ्यांची ७० लाखाने फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास महामंडळाच्या व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आमदार डॉ देवरावजी होळी

171
0

राजेंद्र पाटील राऊत

लगाम धान खरेदी केंद्रांतर्गत ८७ शेतकऱ्यांची ७० लाखाने फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास महामंडळाच्या व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

आमदार डॉ देवरावजी होळी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                    आदिवासी विविध कार्यकारी संस्था लगाम च्या माध्यमातून मागील वर्षाचा आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली फसवणूक

भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन.

शेतकऱ्यांनी तक्रार करू नये म्हणून उलट शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी एस आर एम बरकमकर यांनी धमकी दिल्याचा आरोप

आदिवासी विकास महामंडळ चे प्रादेशिक व्यवस्थापक,उप प्रादेशिक व्यवस्थापक ,जिल्हा पुरवठा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी, ग्रेडर यांचेसह संबंधितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी

गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांची रक्कम हडपण्याचा उद्योग चालवणाऱ्यांची ही मोठी साखळी असल्याचा आरोप

दिनांक १३ मार्च २०२२ गडचिरोली

आदिवासी विविध कार्यकारी संस्था लगाम च्या माध्यमातून आपला मागील वर्षाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तब्बल ८७ शेतकऱ्यांकडून ६९ लक्ष ८४ हजार रुपयाचे धान खरेदी करून ते गोडाउन मध्ये साठवून ठेवून पावती न देता धानाची परस्पर उचल करून फसवणूक केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार, उपप्रादेशिक व्यवस्थापक बरकमकर ,जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली , गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी, ग्रेडर व संस्थेचे अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना त्यांच्या धानाची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.
सदर प्रकरणाची तातडीने चौकशी करून करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावे याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सुभाषजी गणपती, तालुका मुलचेरा चे उपाध्यक्ष विजय विश्वास, युवा मोर्चा अध्यक्ष संजीत सरकार, मुलचेरा येथिल शेतकरी सुकुमार गोविंद दास, प्रताप सुशील पाल,असीम सरकार, हरिपद दास यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले.
शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार करू नये केल्यास उलट शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी अहेरीचे एस आर एम बरकमकर यांनी धमकी दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.

लगाम येथील शेतकऱ्यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्था धान खरेदी केंद्र लगाम येथे २०२१-२२ खरीप हंगाम अंतर्गत ९ हजार धानाच्या पोत्यांमधून ३ हजार ६०० क्विंटल धानाची विक्री दिनांक १० डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये केली. परंतु सदर धानाची ऑनलाईन प्रक्रिया करताना उद्या- परवा होईल व त्यानंतरच पावती मिळेल तोपर्यंत आपले धान गोडावून मध्ये जमा करा त्याची तुम्हाला पोच पावती मिळेल असे सांगितल्याने शेतकऱ्यांनी सदर धान गोडावुन मध्ये जमा केले
धान जमा केल्यानंतर त्याबाबतचे जमा करतानाचे लेखी पावतीही त्यांनी दिली. माञ बराच कालावधी होवूनही ऑनलाइन प्रक्रिया केल्याची पावती शेतकऱ्यांना दिली नाही. आज उद्या करता करता जवळपास मागील २-३ महिन्यांपासून या सर्व शेतकऱ्यांना सातत्याने फिरवत ठेवले माञ अजुनपर्यंत पावती दिली नाही
अखेर यामध्ये शेतकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी आपली फसवणूक झाल्या बाबतची तक्रार संबंधित विभागाला व पोलिस विभागाला दिली. परंतू अजूनपर्यंत त्यांचेवर कोणतीही कारवाही करण्यात आली नाही. यामुळे या गरीब शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झाला आहे. ८७ शेतकऱ्यांचे ६९ लक्ष ८४ हजार रुपये शासनाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून फसवणुकीने हडपण्याचा प्रयत्न यातून करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळ, जिल्हा पुरवठा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी, खरेदी करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी ,अशी मोठी साखळी असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या साखळीच्या वतीने करण्यात येत असूनही शासन त्याकडे कानाडोळा करीत आहे यामुळे गरीब शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत असून गरीब शेतकऱ्यांचे पैसे शासन कशा पद्धतीने परत करणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
सदर प्रकरण अतिशय गंभीर असून या चोर साखळीला संपविण्याचा दृष्टीने सदर प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करून यात दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची रक्कम त्यांना तातडीने अदा करण्याबाबत शासन स्तरावरून तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here