Home पुणे श्री विठ्ठल मंदिर वरील आळी दापोडी येथे श्री विठ्ठल – रुक्मिणी माता...

श्री विठ्ठल मंदिर वरील आळी दापोडी येथे श्री विठ्ठल – रुक्मिणी माता मूर्ती स्थापनेचा ९८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

304

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
श्री विठ्ठल मंदिर वरील आळी दापोडी येथे श्री विठ्ठल – रुक्मिणी माता मूर्ती स्थापनेचा ९८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला कीर्तनामध्ये पहिल्या दिवशी सकाळी काकड आरती दुपारी महिला भजन व हरिपाठ व सायंकाळी ह भ प आनंद महाराज तांबे विश्वस्त चिंचवड देवस्थान यांचे कीर्तन झाले दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन ह भ प नवनाथ महाराज लिमण यांचे झाले. पाहता गोवळी! खाय त्यांची उष्टावळी! करती नामाचे चिंतन!गडी कान्होंबाचे ध्यान! या अभंगावर त्यांनी निरूपण केले कली युगामध्ये नामाचे विशेष महत्व आहे असे त्यांनी सांगितले मनुष्याचा जन्म नाम घेण्यासाठी आहे तरच मनुष्य जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो असे त्यांनी आपल्या कीर्तनात सांगितले यावेळी महाराजांच्या अनाथ आश्रम साठी अनिकेत राजेंद्र काटे स्वीकृत नगरसेवक व राजेंद्र काटे यांच्यावतीने आश्रमास पाच हजार रुपये देणगी देण्यात आली तसेच भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात आश्रमास देणगी देण्यात आल्या यावेळी
परिसरातील सर्व आजी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात व तसेच भाविक भक्त उपस्थित होते.
मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प.सोपानराव भाडळे यांनी सर्वाचे आभार मानले.

Previous articleमेशीत भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.