Home मराठवाडा ना. नवाब मलिक साहेबांवरील ‘ईडी’ने सूडबुद्धीने केलेली कारवाई तात्काळ मागे घ्या! जिंतूर...

ना. नवाब मलिक साहेबांवरील ‘ईडी’ने सूडबुद्धीने केलेली कारवाई तात्काळ मागे घ्या! जिंतूर चे माजी आमदार विजय भांबळे यांचे तहसिलदारांकडे निवेदन..

349

राजेंद्र पाटील राऊत

ना. नवाब मलिक साहेबांवरील ‘ईडी’ने सूडबुद्धीने केलेली कारवाई तात्काळ मागे घ्या! जिंतूर चे माजी आमदार विजय भांबळे यांचे तहसिलदारांकडे निवेदन..

(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
परभणीचे पालकमंत्री ना. नवाब मलिक साहेबांवरील कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ‘ईडी’ने ही कारवाई हेतुपुरस्सर केली असून ती तात्काळ मागे घ्यावी, ही मागणी करत जिंतूर तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन सोपविण्यात आले.
ना. नवाब मलिक साहेब महाविकास आघाडीचे महत्वपूर्ण नेते आहेत. ते सरकारमध्ये अल्पसंख्याक व वक्फ विकासमंत्री या नात्याने उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांनी आजपर्यंत भाजपची अनेक काळी कृत्ये जनतेसमोर आणल्याने खवळलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘ईडी’ची मदत घेत त्यांचे तोंड दाबण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मागील काळात अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काळे धंदे त्यांनी उजेडात आणल्याने त्यांच्यावर मुद्दामहून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ना. नवाब मलिक साहेबांच्या पाठीशी ठाम उभे राहू. देशात कोणत्या स्तराचे राजकारण केले जात आहे, याची जनतेला कल्पना आहे. या घाणेरड्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो.
या संबंधीचे निवेदन यावेळी तहसीलदारांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम उपराष्ट्रीय दाव्यांच्या पडताळणीसाठी सर्वेक्षण
Next articleजिल्हा बँकेचा अनोखा गै र कारभार दहिवड येथील प्रकार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.