Home नांदेड कंटेनर उलटल्याने वाहतुक विस्कळीत

कंटेनर उलटल्याने वाहतुक विस्कळीत

218

राजेंद्र पाटील राऊत

कंटेनर उलटल्याने वाहतुक विस्कळीत
नांदेड / मनोज बिरादार

बाराहाळी ते देगलूर रोडवर उंद्री (प.दे) ते तडखेल रोडवर कंटेनर उलटल्याची घटना मंगळवारी (२२ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घडली.हा कंटेनर रस्त्यात आडवा उलटल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती.दुपारपर्यंत हा ट्रक काढण्यात आला नव्हता.
हे कंटेनर गुजरात हून संगारेड्डी येथे डी मार्टचे साहित्य घेऊन जात होते.कंटेनर क्रमांक(डि एन ०९ क्यू ९५२५ ) कंटेनर उलटून रस्ता पूर्णपणे बंद झाले.हे कंटेनर आज दुपारपर्यंत हटविण्यात आले नव्हते.कंटेनर रस्त्याच्या मधोमध असल्याने या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.