Home उतर महाराष्ट्र टी.के.आर.एच.विद्यालयात कोवीड प्रतिबंधक लसीकरण दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ

टी.के.आर.एच.विद्यालयात कोवीड प्रतिबंधक लसीकरण दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ

297

राजेंद्र पाटील राऊत

टी.के.आर.एच.विद्यालयात कोवीड प्रतिबंधक लसीकरण दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ                                                     निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
आज. दि. १७ फेब्रुवारी गुरुवार रोजी पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत निमगाव येथील टी.के.आर.एच. विद्यालयात निमगाव आरोग्य विभागाने पात्र विद्यार्थ्यांना कोवीड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यास प्रारंभ केला आहे. यावेळी मुख्याध्यापक श्री. के. डी. दाभाडे यांनी कोरोना विषाणू पासून बचाव करायचा असेल तर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. असे सांगून सर्वांनीच लसीकरण करून घेण्याचे आव्हान केले. आरोग्याधिकारी डॉ. माधुरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या श्रीमती आर. आर. अहिरे (आरोग्य सहाय्यिका) श्री. वाय. एन. नंदाळे (आरोग्य सेवक), श्रीमती पी. एच. बच्छाव (आरोग्यसेविका), श्रीमती सोनाली हिरे (आशा सेविका) यांनी विद्यार्थ्यांना लसीकरण केले. याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. बी. एन. पाटील, पर्यवेक्षक श्री. एन. एम. मांडवडे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleसन्मान निधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी सज्जानिहाय कॅम्प घ्या-शिवशंकर पा.कलंबरकर
Next articleलग्न जुळत नसल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेतलं; जाळून घेताच शेतातील गंजीही पेटली अन् होरपळून मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.