Home नांदेड कामगारांच्या मागण्यासाठी प्रहारचे निवेदन

कामगारांच्या मागण्यासाठी प्रहारचे निवेदन

320

राजेंद्र पाटील राऊत

 

कामगारांच्या मागण्यासाठी प्रहारचे निवेदन

नांदेड/ मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातल्या जाहुर येथील ६० कामगारांचे अपडेटचे काम कामगार आयुक्तालय नांदेड यांच्या कार्यालयात अनेक दिवसापासून शुल्लक कारणावरून काम रखडले असून कामगाराचे अपडेट करून रखडलेले काम पूर्ण करावे या मागणीसाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कामगार आयुक्तालय नांदेड येथे निवेदन देण्यात आले आहे.

जाहुर येथील ६० कामगारांचे काम कामगार आयुक्तालय नांदेड येथील कार्यालयात अनेक दिवसापासून रखडले होते . आता ते काम तीन ते चार दिवसात अपडेट करून पूर्ण करावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कामगार आयुक्तालय नांदेड येथे एका प्रहारच्या शिष्टमंडळाकडून आज निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रितपालसिंग शाहू (महानगरप्रमुख नांदेड), मा. अजय हनमंते (कामगार अध्यक्ष नांदेड), गोपाळ पा. हिवराळे (शेतकरी तालुकाध्यक्ष मुखेड ) बालाजी राठोड (तालुका उपाध्यक्ष मुखेड), अमोल भाऊ राठोड,आदी मान्यवरांच्या निवेदनावर सह्या आहेत .

Previous articleराजुरा (बु) येथे महान तपस्वी राजा भगीरथ यांची जयंती उत्साहात साजरी.
Next articleस.पो.नि .महादेव पुरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव वाढदिवसानिमित्त विविध क्षत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.