Home नांदेड राजुरा (बु) येथे महान तपस्वी राजा भगीरथ यांची जयंती उत्साहात साजरी.

राजुरा (बु) येथे महान तपस्वी राजा भगीरथ यांची जयंती उत्साहात साजरी.

308
0

राजेंद्र पाटील राऊत

राजुरा (बु) येथे महान तपस्वी राजा भगीरथ यांची जयंती उत्साहात साजरी.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा (बु) येथे प्रती वर्षा प्रमाणे यंदाही दि.३१ रोजी महान तपस्वी महर्षी राजा भगीरथ यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाने घालून दिलेल्या कोरोनाचे सर्व नियम पाळून हि जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महर्षी राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन जेष्ठ नागरिक गंगाराम मामा चंदावाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच झेंड्याला मानवंदना देऊन प्रार्थना घेण्यात आली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व देश सेवेसाठी कार्यरत असलेले राजुरा नगरीचे भूमिपुत्र सैनिक विकास पुष्पलवार,प्रभाकर जाधव, माजी सैनीक हणमंतराव पाटील शेकापुरे, राम पाटील इंगळे, तसेच भारतीय पोस्ट ऑफिस विभागात नव्याने भरती झालेले विद्या दत्तात्रय पुठेवाड, रोहन दत्तात्रय जाधव, महेश माधवराव इंगळे यांचा शाल व श्रीफळ,पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्यातील अनेक पत्रकार बंधू तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,गंगाराम मामा चंदावाड, पुंडा मामा जंगमवाड, किशन जंगमवाड, बालाजी गुरुजी चंदावाड, अंतेश्वर चंदावाड डॉ. झरीकर साहेब, क्रीडा अधीकारी पुणे चंदबास स्वामी अप्पा,शिवदास राऊत, विलासराव पाटील राजूरकर, हणमंत पाटील शेकापुरे, आनंद जंगमवाड, दत्ता गुरुजी जाधव, दत्ता गुरुजी पोटफोडे, माधव जाधव सर, प्राचार्य रानसेवार सर, विकास पुष्पलवार,राम पाटील इंगळे, सचिन पाटील , अरविंद पाटील,गोपाळ पाटील इंगळे, खंडू राजुरे, केरबा मामा सूर्यसर ,उत्तम गालचलवाड ,बालाजी वडमिलवार, रामदास जंगमवाड यांची उपस्थिती होती. यावेळी
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंतेश्वर चंदावाड यांनी केले तर या कार्यक्रमास गावातील सगर बेलदार गवंडी समाज बांधव व सर्व धर्म समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवंटेकर दांपत्याचा पत्रकारांच्या वतीने सत्कार
Next articleकामगारांच्या मागण्यासाठी प्रहारचे निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here