Home नांदेड रुग्णांनी ताण- तणाव निवारण शिबिरांचा लाभ घ्यावे – डॉ. तहाडे

रुग्णांनी ताण- तणाव निवारण शिबिरांचा लाभ घ्यावे – डॉ. तहाडे

181

राजेंद्र पाटील राऊत

रुग्णांनी ताण- तणाव निवारण शिबिरांचा लाभ घ्यावे – डॉ. तहाडे

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रूग्णालय नांदेड च्या वतीने मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा “मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रम”याच्या सौजन्याने सर्व जनतेस कळविण्यात येते की दि.01/ 02/2022
रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे “ताण तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर” आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावे असे आवाहन मुखेड जिल्हा उप रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.तहाडे यांनी केले आहे.

, या शिबिरात खालील मानसिक समस्या व आजारावर उपचार केले जातील
चिंता, नैराश्य, झोप न येणे, व्यसनाधीनता, जुनाट डोकेदुखी, झटके येणे, करणी,भानामती, स्किझोफ्रेनिया, काल्पनिक आवाज ऐकू येणे, अकारण बडबड, मतिमंदत्व, विस्मरण,लहान मुलांमधील किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले मानसिक ताण- तणाव तसेच अनेक
मानसिक आजार व समस्येवर मानसोपचार तज्ञांमार्फत मोफत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जातील.
तरी संबंधित समस्या व आजार असलेल्या आपल्या जवळील नातेवाईक, मित्र तसेच गावातील सर्व लोकांना शिबिराबाबत माहिती देऊन सहकार्य करावे.असे डॉ.सुधाकर तहाडे यांनी म्हटले आहे.

Previous articleमुखेड येथील वंटेकर दांपत्याचे “सेट” परिक्षेत उल्लेखनीय यश पती-पत्नी एकाचवेळी सेट परिक्षा उतीर्ण
Next articleनाशिक(घोटी) येथील व्हर्टिकल फार्मिंग नवउद्योजकासाठी प्रेरणादायी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.