राजेंद्र पाटील राऊत
नायगाव नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव,कॉंग्रेसचे सतराही उमेदवारांचा दणदणीत विजय.
—————————————————–
नायगाव प्रतिनिधी: निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
नायगाव नगर पंचायत निवडणुकीत माजी आ.तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव पा.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचे १७ पैकी १७ उमेदवारांचा दणदणीत विजय झाला असून आ.राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या एकही उमेदवार निवडून न आल्याने भाजपाचा दारूण पराभव झाला आहे
नायगाव नगर पंचायत निवडणुकीत माजी आ.वसतराव पा.चव्हाण व उपनगराध्यक्ष विजय पा.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सतरा पैकी सतरा उमेदवार निवडून आले आहे आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली नायगावची नगर पंचायत निवडणुक लढवण्यात आली परंतु नायगाव शहरातील जनता आ.पवार यांना झुगारून माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून सतरा उमेदवार निवडून आणले भाजपाला रामराम करत तीन उमेदवारांनी कॉंग्रेसला पाठिंबा देऊन माघार घेतली होती यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १४ जागेसाठी निवडणूक झाली राष्ट्रवादीच्या एका उमेदवारानेही कॉंग्रेसला पाठिंबा दिला राष्ट्रवादी च्या दोन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जिल्हाध्यक्ष नायगावला येऊन भेटीगाठी घेतले परंतु त्यांचा मतदारावर कोणताच प्रभाव पडला नाही असे दिसून आले आहे