Home विदर्भ मोडेभट्टी येथे मामा तलावाचे फॉल (वेस्ट वेर) बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.

मोडेभट्टी येथे मामा तलावाचे फॉल (वेस्ट वेर) बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.

208

राजेंद्र पाटील राऊत

मोडेभट्टी येथे मामा तलावाचे फॉल (वेस्ट वेर) बांधकाम भूमिपूजन करण्यात आले.

गडचिरोली:(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) गडचिरोली तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत जांगदा बु अंतर्गत येत असलेल्या मौजा मोडेभट्टी येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते फॉल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सदर मामा तलावाचे पाणी वाहून जात होते. त्या तलावात पाणी साचत नसल्याने गाव वासियानी हे समस्या सांगितल्याने सदर बांधकामास मंजूर करण्यात आले. यावेळी फॉल बांधकाम मंजूर होऊन, त्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या फॉल बांधकामामुळे वाहून जात असलेला पाणी साचून तेथील शेतकऱ्यांना खुप लाभदायक ठरणार आहे. यावेळी तेथील शेतकऱ्यांनी आभार मानून आनंद व्यक्त केले.
भूमिपूजाप्रसंगी सौ रसिका पोरेटी सरपंच ग्रामपंचायत जांगदा, कामनगडचे सरपंच संजय गावडे, गाव पाटील रामदास हलामी, लक्ष्मण बोगा, रामजी हलामी, माणिक हलामी, निखिल निखारे आदी गावकरी उपस्थित होते.