Home युवा मराठा विशेष कर्नाटक व महाराष्ट्र सरकार निर्लज्यपणाचा कळस.! पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती...

कर्नाटक व महाराष्ट्र सरकार निर्लज्यपणाचा कळस.! पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ….! ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज

558

राजेंद्र पाटील राऊत

कर्नाटक व महाराष्ट्र सरकार निर्लज्यपणाचा कळस.! पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ….!
ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी राजकारण एक सर्कस बनऊन ठेवली आहे. ज्याचा प्रत्यय आपल्याला राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी,अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करताना आणि एकड्या लग्न समारंभासाठी एकत्र भेटताना हास्य संवाद ,करताना पाहताना दिसतात.
परंतु महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचे प्रकार महाराष्ट्रात २ वेळा आणि शेजारील कर्नाटक राज्यात १ वेळा झाल्याची घटना घडली आहे.
परंतु दोन्ही राज्य सरकार ने गंभीर दखल घेतलेली नाही. गेल्या
१. ऑक्टोंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वलसत चे आमदार राजू नवघरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना महाराजांच्या पुतळ्यावर चडून पुष्पहार घालून महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती.
२. नोव्हेंबर महिन्यात जालना जिल्हा मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार छाटून टाकले होती.
ह्या दोन्ही घटनांचा निषेध राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ, मुंबई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृह मंत्री यांना थेट पत्राद्वारे विचारणा केली होती परंतु अजूनही कोणतीच करवाई झालेली दिसली नाही.
आज शेजारील कर्नाटक राज्यात बंगलोर शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी तरी चेहऱ्याला काळे लावले आहे.
परंतु दोन्ही राज्य सरकार यांनी काहीच गंभीर दखल घेतली नाही,आता महाराष्ट्र सरकार सारखेच शेजारील कर्नाटक सरकार देखील असेच हे प्रकरण निर्लज्यपणा दाखवत पाहत बसणार की संबंधितांवर कठोर करवाई करणार हे पाहणे आवश्यक झाले आहे.

Previous articleजन्मदिवस विकासमहर्षींचा……! “महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते मा.काॅ.जे.पी.गावित साहेब” —प्रा.डॉ.गोविंद पाटील.
Next articleपरत मागे फिरा मंत्री यड्रावकर मिनचेकरांना मुरलीधर जाधव यांचे आवाहन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.