Home युवा मराठा विशेष किकवारीच्या “सट्टा किंगला” पोलिस किक मारणार कधी?आदर्श गावाची सट्टा मटकामुळे होतेय सर्वत्र...

किकवारीच्या “सट्टा किंगला” पोलिस किक मारणार कधी?आदर्श गावाची सट्टा मटकामुळे होतेय सर्वत्र नालस्ती…!

532

राजेंद्र पाटील राऊत

किकवारीच्या “सट्टा किंगला” पोलिस किक मारणार कधी?आदर्श गावाची सट्टा मटकामुळे होतेय सर्वत्र नालस्ती…!

(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
कधी एकेकाळी आदर्श गावाची ख्याती मिळवून नावलौकिकास पात्र ठरलेल्या किकवारी (खालचे) जोरण या गावाशेजारी सध्या सट्टा मटकाकिंगचा पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने मोठा धुमाकूळ सुरु असून,वरिष्ठांना मात्र त्याची कर्णापकर्णीही खबर नसल्यामुळे या सट्टा मटका किंगच्या या अवैध व्यवसायामुळे किकवारी गावाचे नाव आदर्श ऐवजी सट्टा मटका किंगची पंढरी म्हणून बदनाम होते किंवा काय अशीही शंका आता जाणकार नागरिक उपस्थित करीत आहेत.
वास्तविक पाहता किकवारी या गावाच्या आसपास असणाऱ्या विरगांव,वनोली,मुंगसे,मुल्हेर,तळवाडे,जोरण,जाखोड आदी भागातून गोरगरीब आदिवासी मोलमजूर आपली कष्टाची केलेली कमाई क्षणिक लोभापायी या सट्टा मटका सारख्या जुगारात हरत असून,पोलिस प्रशासनाने मात्र या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केल्याचे एकंदरीत चित्र असून,आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच या सट्टा मटका किंगचा खुलेआम सुरु असणारा हा अड्डा तात्काळ बंद करुन त्याचा बिमोड करावा अशी मागणी आता पुढे येत आहे.गोरगरीब आयाबहिणीचा तळतळाट व बरबाद होणारी घरे या दृष्ट चक्रातून कायमची मुक्त करावीत अशी मागणी जाणकारांनी बोलून दाखविली आहे.

Previous articleचिकटगाव येथे CDS जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्र्रध्दांजली
Next articleकर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा न्यूज, पत्रकार महासंघाचा पेपर प्रकाशन सोहळा संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.