Home विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात आतिवृष्टीग्रस्त वगळलेल्या गावाचा समावेशाच्या मागणीसाठी जि.प.उपाध्यक्षांनी घेतली पालकमंत्री डाँ.शिंगणेची भेट

बुलढाणा जिल्ह्यात आतिवृष्टीग्रस्त वगळलेल्या गावाचा समावेशाच्या मागणीसाठी जि.प.उपाध्यक्षांनी घेतली पालकमंत्री डाँ.शिंगणेची भेट

403

राजेंद्र पाटील राऊत

बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- अतिवृष्टी झालेल्या यादीतून जी गावे वगळली गेली त्यात टाकळी आस्वंद पातुर्डा खुर्द, पातुर्डा बु॥ या गावांचा समावेश करावा यासाठी मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ उर्फ राजू पाटील यांनी घेतली बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांची भेट
वरील गावात मागील महिन्यात झालेल्या
व सततच्या पावसामुळे कपाशी सोयाबीन व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले तरीसुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावांची नावे अतिवृष्टी झालेल्या यादीत समाविष्ट न केल्यामुळे शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी संगीतराव भोंगळ, टाकळी सरपंच पंजाबराव वानखडे,शेतकरी वर्गातील साहेबराव सुलताने,भास्करराव मेहेंगे,सारंगधर काळे, अरुणभाऊ दामोदर,पोलीस पाटील,वासुदेव मेहेंगे,देविदास सुलताने,देविदास भोंगरे, दिनकर मेहेंगे,धम्मपाल दामोदर,सोपान मेहेंगे,सुधाकर मेहेंगे,दीपक दामोदर,अजय मेहेंगे,ज्ञानेश्वर झाडोकार यांनी भेट घेऊन पालकमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे मागणी केली तरी संबंधित विषयावर लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी दिले.

Previous articleडोक्याला काळ्या पट्टय्या बाधुन राज्य सरकारचा निषेध
Next articleबडे बडे “भाषण” में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’..! विरोधी पक्ष नेते यांनाही आदर देणारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.