Home मुंबई बडे बडे “भाषण” में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’..! विरोधी...

बडे बडे “भाषण” में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’..! विरोधी पक्ष नेते यांनाही आदर देणारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे..?

219
0

राजेंद्र पाटील राऊत

बडे बडे “भाषण” में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है’..! विरोधी पक्ष नेते यांनाही आदर देणारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे..?

ठाणे ( अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाच्या भूमीपूजनाचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांची माफी मागत त्यांनाही नमस्कार केला. ते म्हणाले, “देवेंद्रजी, सॉरी, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आणि आमचे सहकारी देवेंद्रजी” आणि यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या प्रसंगी
या कार्यक्रमास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी यांनी पुण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्र सरकारकडून काही अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत. पालखीमार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

उन वारा पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो.”

Previous articleबुलढाणा जिल्ह्यात आतिवृष्टीग्रस्त वगळलेल्या गावाचा समावेशाच्या मागणीसाठी जि.प.उपाध्यक्षांनी घेतली पालकमंत्री डाँ.शिंगणेची भेट
Next articleराज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन! १६ विभागातील ४५ आगारामधील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ..? उद्या मंत्रालयावर धडक मोर्चा…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here