• Home
  • बुलढाणा जिल्ह्यात आतिवृष्टीग्रस्त वगळलेल्या गावाचा समावेशाच्या मागणीसाठी जि.प.उपाध्यक्षांनी घेतली पालकमंत्री डाँ.शिंगणेची भेट

बुलढाणा जिल्ह्यात आतिवृष्टीग्रस्त वगळलेल्या गावाचा समावेशाच्या मागणीसाठी जि.प.उपाध्यक्षांनी घेतली पालकमंत्री डाँ.शिंगणेची भेट

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211108-WA0093.jpg

बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- अतिवृष्टी झालेल्या यादीतून जी गावे वगळली गेली त्यात टाकळी आस्वंद पातुर्डा खुर्द, पातुर्डा बु॥ या गावांचा समावेश करावा यासाठी मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ उर्फ राजू पाटील यांनी घेतली बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांची भेट
वरील गावात मागील महिन्यात झालेल्या
व सततच्या पावसामुळे कपाशी सोयाबीन व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले तरीसुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावांची नावे अतिवृष्टी झालेल्या यादीत समाविष्ट न केल्यामुळे शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी संगीतराव भोंगळ, टाकळी सरपंच पंजाबराव वानखडे,शेतकरी वर्गातील साहेबराव सुलताने,भास्करराव मेहेंगे,सारंगधर काळे, अरुणभाऊ दामोदर,पोलीस पाटील,वासुदेव मेहेंगे,देविदास सुलताने,देविदास भोंगरे, दिनकर मेहेंगे,धम्मपाल दामोदर,सोपान मेहेंगे,सुधाकर मेहेंगे,दीपक दामोदर,अजय मेहेंगे,ज्ञानेश्वर झाडोकार यांनी भेट घेऊन पालकमंत्री महोदयांना निवेदनाद्वारे मागणी केली तरी संबंधित विषयावर लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी दिले.

anews Banner

Leave A Comment